¡Sorpréndeme!

गाऊन घालून मंदिरात गेल्यानं महिलांमध्ये जुंपली | Mumbai Latest News

2021-09-13 1 Dailymotion

गाऊन घालून मंदिरात प्रवेश केल्यानं दोन महिलांमध्ये मारामारी झाल्याची घटना कल्याण इथं घडली आहे. मंदिरात गाऊन घालून प्रवेश केल्याचा जाब विचारल्यानं महिलेनं समोरच्या महिलेला मारहाण केली.
मारहाण करणारी महिला पोलीस कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कल्याण च्या तिसगाव भागातील तिसाई मंदिरात काल (मंगळवारी) रात्री सात च्या सुमारास महिला पोलीस अधिकारी प्रतीक्षा लाकडे मंदिरात गाऊन घालून गेल्या. या मंदिरात गाऊन घालून जाऊ नये असा नियम असल्यानं आशा गायकवाड या स्थानिक महिलेनं प्रतीक्षा लाकडे यांना याबाबत जाब विचारला. यानंतर प्रतिक्षा लाकडे यांचा पारा चढला अन् संतापाच्या भरात लाकडे यांनी गायकवाड यांना जमिनीवर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यात आशा गायकवाड जखमी झाल्या आहेत.
गाऊन घातलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश न देणं हा प्रकार चुकीचा असला तरी, लाकडे या पोलीस अधिकारी असल्यानं त्या या बाबत तक्रार करू शकल्या असत्या. त्यामुळे कल्याण पूर्व भागातील जनतेकडून पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
या दोन्ही महिलांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतल्यानं पोलीस लाकडे यांना पाठिशी घालत आहेत असा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews